मुंबई महापालिका प्रत्येक मुंबईकराकडून प्रतिहजार लिटर पाण्यासाठी आकारते…
फक्त ३.५०/- रु.
मुंबई महापालिकेने बांधलेलं ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण’ हे जगातील ९ वे सर्वात वेगानं बांधलं गेलेलं धरण आहे. यामुळे मुंबई महापालिकेची पाण्याची एकूण साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या धरणावर वीजनिर्मिती केंद्र उभारण्यासाठी मुंबई महापालिकेला मार्ग सुकर करून दिला आणि मुंबईच्या विकासयात्रेत एका धरणासह एक वीजनिर्मिती केंद्र सामील झालं.
शिवसेनेच्या कार्यकाळात पाणीपुरवठ्याचं नियोजन इतकं सुनियोजित होतं कि, कितीही दुष्काळाचं सावट असले तरी मुंबईला भीषण पाणीटंचाई कधीच जाणवलं नाही.
चीन किंवा जपानमध्येही नसलेले, आशियातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र मुंबई महापालिकेने उभारले आहे. आमचे आवाहन असे की, जिथे हे जलशुद्धीकरण केंद्र आहे, तेथे तयार होणारे पाणी बिसलेरीच्या पाण्यापेक्षा शुद्ध आहे.
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाईन्सची एकत्रित लांबी ७,००० किलोमीटर आहे म्हणजे मुंबईपासून लंडनपर्यंतच्या अंतराइतकी!
दूषित पाण्याचा पुरवठा होऊ नये म्हणून ‘मरोळ ते रुपारेल’ आणि ‘रुपारेल ते कुलाबा’ या जलवाहिन्या ९० फूट खोलवर नेण्यात आल्या.
पाण्याचा दाब आणि गळती यावर सतत निगरानी ठेवण्यासाठी मुंबईतील जलवाहिन्यांवर SCADA System (Supervisory Control and Data Acquisition System) द्वारे देखरेख ठेवली जाते, जे इतर शहरांत सहसा आढळत नाही.
