loader image

मुंबईसाठी कोस्टल रोड हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं फक्त स्वप्न नव्हे तर एका कुशल राज्यकर्त्याची चुणूक दाखवणारा प्रकल्प

भारतातील पहिल्या अन् एकमेव ‘सागरी किनारी मार्गा’चं निर्विवाद श्रेय जातं ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ ह्यांच्या दूरदृष्टीला.

जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा कोस्टल रोडच्या कामाला गती मिळाली. अत्याधुनिक तंत्राचा वापर करुन भारताचा पहिला समुद्राखालील बोगदा (Undersea Tunnel) पूर्ण झाला.

टनेल बोरिंग मशीन (TBM) ला ‘मावळा’ हे नाव देऊन अभियांत्रिकी क्षेत्रातील अचाट काम मुंबईने करुन दाखवले.

नरिमन पॉईंट ते दहिसरपर्यंतचं अंतर फक्त २० मिनिटांत पार करता यावं हे व्हिजन होतं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं.

समुद्री जीवसृष्टीला धक्का न लावता, पर्यावरण तज्ज्ञांच्या देखरेखीखाली भराव क्षेत्राचं काम (Reclamation) पूर्ण करण्यात आलं.

कोस्टल रोड प्रकल्प आखतानाच ५०+ हेक्टर नवीन मोकळ्या जागा,समुद्रकिनारी सुसज्ज प्रॉमेनाड्स, लँडस्केप्ड गार्डन्स, अम्फीथिएटर झोन्स, सायकल आणि जॉगिंग ट्रॅक्स या सर्व पूरक सुविधांचं आखीव रेखीव नियोजन करण्यात आलं.

सर्व कंत्राटं जागतिक स्पर्धात्मक निविदांद्वारे (Global Competitive Bidding) दिली गेली. हा संपूर्ण प्रकल्प राबवताना उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर कुण्या एकानेही भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही.

ह्याचसोबत, शिवसेनेने मुंबईत १९४८.१७ किलोमीटर्सचं रस्त्यांचं जाळं विणलं आहे म्हणजेच फ्रान्स ते पोलंड ह्या आंतरराष्ट्रीय अंतराइतकं.

कोविडसारख्या अभूतपूर्व संकटातही तत्कालीन मुख्यमंत्री ऊधव बाळासाहेब ठाकरेंनी वरळी–शिवडी कनेक्टरच्या काम सुरु केलं, तसंच अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) चा पहिला गर्डर जानेवारी २०२० मध्ये लॉन्च करून अल्पावधीतच ८२% काम पूर्ण केलं.

हिंदमाता उड्डाणपूल आणि परळ उड्डाणपूल यांदरम्यानचा कनेक्टर केवळ २.५ महिन्यांत पूर्ण करण्यात आला. नव्या उड्डाणपुलांमुळे सातरस्ता ते महालक्ष्मी स्टेशन, विक्रोळी स्टेशन परिसराती वाहतूक कोंडी भूतकाळात जमा होणार आहे. घाटकोपर-मानखुर्द फ्लायओव्हरमुळे नवी मुंबई, ठाणे आणि सायन मार्गावरील प्रवासात २५ मिनिटांची बचत झाली.

सुमारे २० किमी लांबीच्या एल.बीए.स. मार्ग व अंधेरी-घाटकोपर लिंक रोड रुंदीकरण व सुधारणा, तसंच पादचारी पदपथांची निर्मिती केली गेली.

एक महत्त्वाचे व्यवसाय केंद्र असलेल्या परळ परिसरातील आगामी डिलाईल पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे. ७५० मीटर लांबीच्या मृणालताई गोरे उड्डाणपुलामुळे गोरेगाव पूर्व–पश्चिम लिंक रोडवरील वाहतूक अधिक सुलभ होईल. ९३२ मीटर लांबीच्या कोरा केंद्र उड्डाणपुलांमुळे बोरिवली पश्चिम परिसराला वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळेल.

तसंच मुंबईत ३२ सार्वजनिक वाहनतळ, ९१ ठिकाणी पे ऍण्ड पार्क योजना कार्यान्वित करण्यात आले होते.

महत्त्वाचं म्हणजे मुंबईत एक-दोन नव्हे तर १६ एजन्सीस काम करत असतात. मग कुणी रस्ता खणून ठेवतं, खड्डे तसंच ठेवतात पण उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या सर्व एजन्सीसशी समन्वय साधत मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून, ३१ मेपर्यंत रस्त्यांची कामं पूर्ण करुन घेत असत.