loader image

महापालिका शाळांबद्दलची धारणा बदलणारा… ‘मुंबई पब्लिक स्कुल’ चा यशस्वी प्रयोग !

‘मुंबई पब्लिक स्कूल्स’ या एका लक्षवेधी प्रकल्पाने आदित्य उद्धव ठाकरेंनी महापालिकेच्या शिक्षणव्यवस्थेचा चेहरामोहराच बदलून टाकला.

शाळांच्या सुसज्ज व देखण्या इमारती, अत्याधुनिक शिक्षणपद्धती आणि पूर्णपणे मोफत शिक्षण यामुळे, ज्या मनपा शाळांमध्ये दरवर्षी सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांची घट होत होती, त्या शाळांमध्ये आता प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची प्रचंड रिघ लागू लागली.

१,२३४ शाळांमध्ये ८ भाषिक माध्यमांमध्ये ३,२५,०००+ विद्यार्थ्यांना शिक्षण

सुसज्ज ई-वाचनालय, मोफत BEST बससेवा, गणवेश, दप्तर, आरोग्य शिबीरं, मुलींसाठी सॅनिटरी पॅड्स, व्हेंडिंग मशिन्स अशा स्वरूपातील २८ शालेय साहित्य मोफत

पहिली महापालिका जिथे सॅटेलाईट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साकारले ६००+ व्हर्चुअल क्लासरूम

विद्यार्थ्यांच्या दप्तरातील पुस्तक-वह्यांचं ओझं कमी व्हावं ह्यासाठी ५ भाषांमध्ये ६२०००+ विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅब

जगातील एकमेव महापालिका जिथे CBSE, ICSE, IGCSE, IB आणि SSC या सर्व बोर्डांतून मोफत शिक्षण दिलं जातं आणि त्यासाठी पूर्वीचे शिक्षक कमी न करता त्यांना नव्या पद्धतीनुसार प्रशिक्षित करण्यात आलं.

शाळांची ४०–४५% पर्यंत घसरलेली गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची समग्र जाण वाढवण्यासाठी, आदित्य ठाकरे यांनी अनेक सामाजिक संस्था, शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांना सोबत घेऊन एक रोडमॅप तयार केला. त्याचा परिणाम असा की आज ती गुणवत्ता ८५–९०% पर्यंत उंचावली आहे.

मुलींची शालेय उपस्थिती वाढवण्यासाठी प्रोत्साहन भत्ता देण्याची योजनाही राबवली गेली.

मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना पोषणयुक्त आहार मिळावा म्हणून आदित्य ठाकरे यांनी ‘मुंबई पब्लिक स्कूल्स’मध्ये ‘अक्षयपात्र’ आणि महिला बचत गटांमार्फत आरोग्यदायी व रुचकर मध्यान्ह भोजन देण्याची व्यवस्था उभी केली.