loader image

शहरावर प्रचंड ताण आणि भौगोलिक मर्यादा असताना उत्कृष्ट कचरा, सांडपाणी व आपत्ती व्यवस्थापन

२०१७ पर्यंत मुंबईत प्रतिदिनी १० हजार मेट्रिक टन इतका कचरा गोळा केला जायचा म्हणजे १०० रणगाड्यांच्या वजनाइतका अवाढव्य.

शिवसेनेने कचरा वर्गीकरणावर भर दिला. त्यासाठी मार्गदर्शन, प्रदर्शन शिबिरं आयोजित केली. ओला – सुका कचरा वर्गीकरण, विलीनीकरण व्हायलाच पाहिजे हा दृढनिश्चय केला, नागरिकांना प्रोत्साहित केलं.

गृहसंकुलं, सेवाभावी संस्था, तज्ञ कंपन्यांना एकत्र आणून, केवळ एका वर्षात कचऱ्याचे प्रमाण १०,००० मेट्रिक टनांवरून ६,५०० मेट्रिक टनांपर्यंत कमी करण्यात यश. ‘झीरो वेस्ट’ राबवणाऱ्या इमारतींना मालमत्ता करात ५% सूट दिली.

प्रत्येक दिवशी ४०० टन कचऱ्यावर उगमस्थळीच प्रक्रिया. देवनार डम्पिंग ग्राऊंडवर रोज २,४०० टन कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारे दोन प्रकल्प उभारले.

मुंबईत साचणारं पावसाचं पाणी समुद्रात फेकण्यासाठी इर्ला, हाजी अली, लव्हग्रोव्ह, ब्रिटानिया, क्लिव्हलँड, गझदरबंध अशा
६ पम्पिंग स्टेशन्समधून ७५००० दशलक्ष लीटर पाण्याचा निचरा केला जातो!

मुंबईत वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, घाटकोपर, भांडुप अशी ७ सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STPs) कार्यरत. ज्यांची एकत्रित क्षमता सुमारे २,४६४ एमएलडी (MLD – दशलक्ष लिटर प्रतिदिन) आहे. प्रक्रिया केलेलं पाणी उद्यान, मैदान, वाहन धुणे, इतर उद्योग व इमारती वापर दिलं जातं.

मुंबईच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे शहरातील ५,००० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून थेट फीड येते, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवणं आणि प्रतिसाद देणं सोपं होतं, हे कॅमेरे अग्निशमन दल, पोलीस आणि इतर यंत्रणांसोबत समन्वयासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.