सुंदर उद्यानं, मैदानं, मोकळ्या जागा, मुंबई २४x७ संकल्पना, नाट्यगृह आणि बरंच काही.
शहरातील मोकळ्या जागा त्या शहराची फुफ्फुसं असतात म्हणूनच मुंबईतील मोकळ्या जागा आणि नैसर्गिक वैभव जपण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे कमालीचे आग्रही असतात.
‘मुंबईतील मोक्याच्या जागा, मैदानं, मिठागरं, कांदळवनं, वृक्षसंपदा, उद्यानं ह्यांवर गंडांतर येतं तेव्हा त्या अघोरी विनाशाच्या प्रकल्पांना ‘ठाकरी’ शैलीत कडाडून विरोध केला जातो. ‘आरे’ सारख्या प्रचंड जैविविधता असलेल्या हरितपट्ट्याला उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना ‘जंगल’ म्हणून घोषित केलं.
वीरमाता जिजामाता भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय
उद्यानाचं पुनरुज्जीवन, प्राण्यांची शास्त्रीय पद्धतीने देखभाल आणि पेंग्विनसारख्या बर्फाळ प्रदेशातील प्राण्यांना पाहण्याची संधी मुंबईकरांना उपलब्ध करुन देणं अशा उपक्रमांनी आदित्य ठाकरे यांनी उद्यानाचा असा काही कायापालट केला की, आज या उद्यानातून मुंबई महापालिकेला प्रत्येक दिवशी लाखोंचा महसूल मिळतो.
व्ह्युईंग डेक – Sea Viewing Deck समुद्री सौंदर्य दर्शक मंच
मुंबईकरांच्या विरंगुळ्यासाठी आणि शहरी सौंदर्यासाठी आदित्य उद्धव ठाकरेंनी स्टॉर्म वॉटर ड्रेन आऊटफॉल्सचे रूपांतर सागरी सौंदर्य दर्शक मंचांमध्ये केले आहे. दादरला त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर Sea Viewing Deck आणि गिरगाव Sea Viewing Deck हे लाटांची किमया, सूर्यास्ताची सोनेरी रेघ आणि मुंबईच्या किनाऱ्याचं अप्रतिम सौंदर्य अनुभवण्याची संधी देतात.
श्री गणेश द्वार, दादर
हे गणेश द्वार कला अन् अध्यात्माचा ऊत्तम संगम आहे. मुंबईत ही कमान उभारताना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी प्रशासकीय अडथळे तर हटवलेच, पण कलात्मक सहकार्यही केलं.
मुंबईत गोराईत उभारलं देशातलं पहिलंवहिलं कांदळवन उद्यान
मुंबईचं सुरक्षाकवच असणाऱ्या कांदळवनांचं रक्षण करण्यासाठी तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य उद्धव ठाकरे ह्यांनी ११,००० हेक्टरपेक्षा अधिक कांदळवन क्षेत्र संरक्षित तर केलंच आणि गोराईला ८ हेक्टरच्या परिसरात भारतातील पहिलं ‘मॅनग्रोव्हज पार्क’ची निर्मिती करून पर्यावरण धोरणात राज्याला एक दिशा दिली.
या उद्यानात ७४० मीटर लांबीचा उंच लाकडी पदपथ आहे, ज्यामुळे पर्यटकांना दाट खारफुटीचा परिसर पर्यावरणाला हानी न पोहोचवता पाहता येतो.
हे उद्यान पर्यावरण शिक्षण आणि संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आलं आहे, ज्यामध्ये निसर्ग माहिती केंद्र आणि पक्षीनिरीक्षण मनोरा (वॉचटॉवर) देखील आहे.
एलिव्हेटेड नेचर वॉकवे, मलबार हिल
हा मुंबईतीलच नव्हे तर देशातील पहिला ‘एलिव्हेटेड नेचर वॉकवे’ प्रकल्प आहे. तुम्हाला असाच ‘ट्री टॉप वॉक’ प्रकल्प सिंगापूरमध्ये पाहायला मिळतो. आदित्य उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतून राबविला गेलेला हा ‘नेचर वॉकवे’ दाट झाडीतून नेत अरबी समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्याचा सुखद अनुभव देतो.
माहीम किल्ला व रेतीबंदर
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या माहीम किल्ल्याचं पुनरुज्जीवन तत्कालीन आदित्य उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने करण्यात आलं आहे. किल्ल्यावरील अतिक्रमण हटवून संरक्षक भिंती बांधून हा माहीम किल्ला सर्वांसाठी खुला करण्यात आला. २४६० चौ.मी. आकाराच्या ह्या पर्यटन स्थळात सुशोभित रेतीबंदर, ओपन जीम, वॉच टॉवर अशा लोकोपयोगी गोष्टी उपलब्ध आहेत.
नाट्यगृहं, जलतरण तलाव आणि मैदानं
मुंबई महापालिकेने ४–५ उत्कृष्ट नाट्यगृहांची उभारणी केली असून, मुलुंडमधील महाकवी कालिदास नाट्यगृह आधुनिकतेचा आदर्श नमुना आहे. तसंच ११ सुसज्ज जलतरण तलाव आणि ७२५ हून अधिक उद्यानं आणि मैदानं जी मुंबईकरांच्या सेवेस रुजू आहेत.
हेरिटेज वॉक – सफर ऐतिहासिक मुंबईची
मुंबईतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या विलोभनीय वास्तू बईकरांना, पर्यटकांना त्यांच्या इतिहासासह पाहता याव्यात ह्यासाठी आदित्य उद्धव ठाकरेंनी मुंबईत ‘हेरिटेज वॉक’ सुरु केले आणि मुंबईचा ऐतिहासिक वारसा अनेकांना अनुभवता आला.
मुंबई २४x७
मुंबईसारख्या जागत्या शहरात रात्री कामानिमित्त असेल किंवा शहर अनुभवण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांना हॉटेल्स, कॅफे, निवांत आणि सुरक्षित जागा अशा सोयी उपलब्ध व्हाव्यात ह्यासाठी आदित्य उद्धव ठाकरेंनी ‘मुंबई २४x७’ ही संकल्पना मांडली. पण तेव्हा मोठा गहजब उभा केला गेला, पार्टी-पब कल्चर म्हणत हिणवलं गेलं पण कालांतराने हीच संकल्पना केंद्र सरकारने अमलात आणली. आज मुंबईकर ‘२४ तास हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मुंबई’ अनुभवत आहेत ते व्हिजन होतं आदित्य उद्धव ठाकरेंचं.
