loader image

दरवर्षी १,००,४४,००० रुग्णांवर माफक दरात वैद्यकीय उपचार करणारी आशियातील सर्वात मोठी महापालिका !

‘प्राथमिक आरोग्य’ सेवा पुरवणं हीच साधारणपणे महापालिकेची जबाबदारी असते. पण मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका आहे जी ४ वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयं, १ दंत महाविद्यालय, २९ प्रसूतिगृहं, १६ उपनगरीय रुग्णालयं, ६ विशेष रुग्णालयांमधून मुंबईकरांना आरोग्य सेवा पुरवते.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अंदाजे १५,००० रुग्णशय्या मुंबईकरांच्या सेवेसाठी उपलब्ध असतात.

कर्करुग्णांच्या उपचारांसाठी अद्ययावत ‘प्रोटॉन थेरपी’ सुविधा उपलब्ध करुन देणारी भारतातील पहिली महानगरपालिका म्हणजे मुंबई महापालिका.

१६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, ईसीजी, एक्स-रे या सेवा रुग्णांना मोफत, तर डायलिसिस नाममात्र दरात उपलब्ध आहेत.

मुंबई महापालिकेच्या १९० दवाखान्यांमध्ये आणि २१२ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किमान ९०% वैद्यकीय सेवा आणि १४०+ जीवनावश्यक औषधे पूर्णपणे मोफत दिली जातात.

२८ प्रसूतिगृहांमध्ये दर ३५.४ मिनिटांनी एक बाळ जन्माला येते, आणि उत्कृष्ट आरोग्यसुविधांमुळे नवजात बालमृत्यूचा दर अत्यंत कमी आहे. हे मुंबईच्या प्रभावी मातृ-शिशु आरोग्य व्यवस्थेचं द्योतक . बालरोग विभागांतर्गत मुलांना आजारांपासून संरक्षणासाठी मोफत लसीकरण केले जाते.

मुंबई महापालिकेचं आरोग्य बजेट हा काही देशांच्या राष्ट्रीय आरोग्य बजेटपेक्षाही जास्त आहे. मूलभूत आरोग्य सेवेसोबतच नाममात्र दरातील अतिदक्षता व तज्ज्ञ उपचार उपलब्ध करून देणाऱ्या मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा कारभार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गेली २५ वर्षे ‘कुटुंबप्रमुखा’प्रमाणे सांभाळला आहे.