भारतातील सर्वोत्तम महानगरीय बससेवा म्हणजे मुंबईकरांची ‘बेस्ट’ आणि तिकीट दर होता…
फक्त ५/- रु.
शिवसेनेच्या सत्ताकाळात शहराच्या ‘४३८ मार्गा’वरून अत्यंत ‘माफक तिकीट दरा’त प्रत्येक दिवशी ‘३० लाखांहून अधिक प्रवाशां’ना तब्बल ‘३५००+ बेस्ट बसेस’ सेवा देत असत.
एखाद्या शहराची सुस्थित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे त्या शहरातील कष्टकऱ्यांसाठी वरदान असते. पण अनेकदा खासगी भिडूंना मोकळं रान मिळावं, ह्यासाठी जाणूनबुजून ती व्यवस्था मारली जाते. हे दुष्टचक्र मुंबईकरांच्या वाट्याला येऊ नये म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या ‘बेस्ट’ला कायम प्राधान्य दिलं.
त्यानंतर, २०१३ सालापासून आदित्य उद्धव ठाकरे मुंबईत इलेक्ट्रिक बससेवेसाठी आग्रही होते. त्यादृष्टीने आदित्य ह्यांनी एक ध्येय ठरवलं कि,
२०२७ पर्यंत मुंबईत संपूर्णतः पर्यावरणपूरक, वातानुकूलित आणि सर्वात स्वस्त व स्थिर तिकीट दरांसह १०,००० इलेक्ट्रिक बेस्ट बसेस मुंबईकरांच्या सेवेत रुजू करायच्या.
२०१८ साली आदित्य ह्यांनी अजून एक ध्येय पूर्ण केलं ते म्हणजे मुंबईकरांना वातानुकूलित आणि सुसज्ज बससेवा द्यायची तीही अत्यंत माफक तिकिट दरांमध्ये…
५ कि.मी. साठी फक्त ५ रु.
१० कि.मी. साठी फक्त १० रु
१५ कि.मी. साठी फक्त १५ रु.
आणि २० रु. तर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या बसमधून मुंबईत कुठेही जाऊ शकत होतात…
आणि हो, ५ कि.मी. साठी ५ रु. हे जगातील सर्वात स्वस्त प्रवासभाडं होतं.
आज मुंबईत संपूर्णतः आधुनिक, इलेक्ट्रिक आणि पर्यावरणपूरक एसी बस, मिनी बस, मिडी बस, लॉन्ग बस, डबल डेकर अशा बस दिसतात त्याचं सर्व श्रेय आदित्य उद्धव ठाकरे ह्यांना जातं.
दिल्ली, चेन्नई, कोलकता, बेंगलोरच नव्हे तर लंडन, न्यूयॉर्क, सिंगापूर, टोकियो, दुबई ह्या जगातील मोठ्या शहरांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या तुलनेत मुंबईची ‘बेस्ट’ सर्वात स्वस्त बससेवा आहे !
प्रत्येक ५ मिनिटांला सुरु असणाऱ्या फोर्ट फेरीमुळे प्रतिवर्षी ५० लाख+ मुंबईकरांना ऑफिसला वेळेवर पोहोचणं सुलभ झालं.
महत्त्वाचं म्हणजे अनेक शहरांतील पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम्स आचके देत असताना आपली ‘बेस्ट’ नवनव्या उपक्रमांसह आजही मुंबईच्या रस्त्यांवर दिमाखात धावते ती आदित्य उद्धव ठाकरेंच्या आधुनिक व पर्यावरणपूरक व्हिजनमुळेच.
भारतातील महापालिकेमार्फत वीज वितरण करणारं सर्वात मोठं, स्वस्त व यशस्वी मॉडेल म्हणजे BEST
महानगरीय वीज वितरण प्रणालीत जगातील लॉस एंजेलिस, सिएटल, टोरांटो, झ्युरिच, व्हिएन्ना, म्युनिक ह्या शहरांच्या मालिकेत आपल्या मुंबईच्या BEST चं नाव घेतलं जातं.
